भाजप शिवसेना e sakal
महाराष्ट्र बातम्या

छत्रपती संभाजीराजेंशी नारायण राणेंची तुलना; सेना आमदाराची भाजप नेत्याविरुद्ध तक्रार

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : जनआशीर्वाद यात्रेचे समन्वयक प्रमोद जठार (bjp leader pramod jathar) यांच्याविरोधात शिवसेनेने रत्नागिरी पोलिसांत तक्रार (ratnagiri police) नोंदविली आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबत राणेंची तुलना केल्यामुळे ही तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात आणखी नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ''२४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले'', असं वक्तव्य प्रमोद जठार यांनी केलं होतं. त्याचविरोधात आता सेना आक्रमक झाली आहे. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलंय, की ''जठार यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी केली आहे. नारायण राणे हे फौजदारी केसमध्ये संशयित आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे निंदनीय कृत्य आहे. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे, असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे तुलना केल्याने तक्रारदार यांचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या भावना दुखावली आहे.''

तसेच प्रमोद जठार यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचेही साळवे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जठार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही साळवे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT