santosh bangar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

ज्या आमदारांना घर हवं ते घेतील बाकी नाकारतील : संतोष बांगर

ज्या आमदारांना घर हव आहे ते घेतीलच-संतोष बांगर

सकाळ डिजिटल टीम

राज्यभरातील ३०० आमदारांना मुंबईमध्ये (Mumbai) घर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. यावर राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मुख्यमंत्र्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संतोष बांगर म्हणाले, राज्यातील आमदारांना मुंबईत घर आवश्यक आहे. ज्या आमदारांना घर हव आहे ते घेतीलच.ज्यांना नको आहे ते नाकारतील असेही ते म्हणाले. यावेळी बांगर यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना बांगर म्हणाले, मुख्यमंत्री जो निर्णय घेतात तो योग्यच असतो. नागरीकांचे प्रश्न, भागातील विकासाचे काही प्रश्न मांडण्यासाठी आमदार विधानसभेत जातात. यावेळी त्यांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आहे. ज्यांची राहण्याची व्यवस्था होत असेल अशांनी घरं नाकारली असतील असेही ते म्हणाले.

राज्यातील ३०० आमदारांना मुंबई घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून भाजप नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येणार असल्याचा खुलासा आव्हाड यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT