Rahul Shewale Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Shewale : त्याचे पाकिस्तान, कराची कनेक्शन...; पीडित तरुणीचे धक्कादायक खुलासे; VIDEO व्हायरल

राहुल शेवाळेंनी आपल्याला लग्नाचं वचन देऊन आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि त्यांच्यावरचे अत्याचाराचे आरोप हा विषय यंदा हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा पेटला. आता या तरुणीने शेवाळेंवर काही गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संंबंधित या तरुणीचे दाऊदशी संबंध असून तिने आपल्यावर खोटे आरोप केल्याचं शेवाळे यांनी सांगितलं होतं. मात्र आता या तरुणीने राहुल शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप करत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

या तरुणीने आपला व्हिडीओ ट्विट करत हे खुलासे केले आहेत. या व्हिडीओमध्ये ही तरुणी सांगते, "मी भारताची कन्या आहे. मला न्याय हवा आहे. पण माझ्यावर खासदार राहुल शेवाळे दाऊद, पाकिस्तानचे संबंध असल्याचे बिनबुडाचे आरोप करुन ते मला बदनाम करत आहेत. त्यांना आपले गुन्हे लपवायचे आहेत. त्यांनी माझ्यावर शारिरीक मानसिक अत्याचार केले आहेत. माझ्यावर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत."

ही तरुणी पुढे म्हणाली, "याच्याविरोधात मी आधीच साकीनाका पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यांच्या राजकीय शक्तीमुळे माझा एफआयआर दाखल करुन घेतला नाही. मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. माझ्यावर दोन खोट्या केसेस केल्या आहेत."

राहुल शेवाळे आणि आपल्या रिलेशनशीपबद्दल सांगताना ही तरुणी म्हणाली, "ते दोन वर्षे माझ्यासोबत कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी मला लग्नाचं वचन दिलं होतं, लग्नाचं वचन देऊनच त्यांनी हे नातं सुरू केलं होतं. मला तो दारू पिऊन, शारिरीक, मानसिक अत्याचार करायचा. लग्नाचं विचारल्यावर तो मला आणि माझ्या परिवाराला धमकी द्यायचा".

दाऊदशी कनेक्शन असल्याच्या शेवाळेंच्या आरोपाला उत्तर देताना ही तरुणी म्हणाली," मी फॅशन डिझायनर असून दुबईची आहे. माझी तिथे कंपनीसुद्धा होती. माझे तिथे सगळ्या देशातले मित्रही आहेत. म्हणून तो माझ्यावर दाऊन, पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे बिनबुडाचे आऱोप करत आहे. माझं काहीही कनेक्शन असेल, तर मी एनआयएला विनंती करते, की तुम्ही कधीही माझे कॉल रेकॉर्ड चेक करा. माझा पासपोर्ट पाहा, मी देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक एक कॉपी पाठवते. त्याचं म्हणणं आहे की, मी दोन वेळा कराचीला गेले आहे. माझा पासपोर्ट चेक करा. मी दुबईतही तक्रार केली, तर तिथेही त्याने मला अटक करायला लावली. मी ७८ दिवस जेलमध्ये होते, आता सुटून आले, तर इथेही तो मला त्रास देत आहे."

ही तरुणी पुढे म्हणाली, "मला जेव्हा तो दुबईला भेटायला यायचा, त्यानंतर तो कुठे जायचा, तो किती वेळा पाकिस्तान, कराचीला गेलाय, ते सगळं चेक करा, त्याचा पासपोर्ट चेक करा, त्याची संपत्ती करा. त्याचे काय लेव्हलचे दुबईचे कनेक्शन आहेत चेक करा. त्याने तिथल्या सुनावणीचे कोर्टातले, जेलमधले फोटोही घेतले आहेत, त्यामुळे त्याचं कनेक्शन चेक करा. फक्त या भारताच्या कन्येलाच नव्हे तर भारतालाही बदनाम केलं जात आहे. मला न्याय हवा आहे. माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT