महाराष्ट्र बातम्या

...तर पाय अडकून पडाल, संजय राऊतांचा कोश्यारींना इशारा

नामदेव कुंभार

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार (Govern Vs Maharashtra Government) यांच्यातील वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याचं चित्र आहे. मंगळवारी नवाब मलिक यांनी उघडपणे राज्यपालांवर टीकास्र सोडलं होतं. तर आज, बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत ताशोरे ओढले आहेत. राज्यपाल सरकारच्या कामकाजात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यानंतर महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल, तर पाय अडकून पडाल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला आहे.

राजभवन हे सरकारची मदत करण्यासाठी आहे, खेचण्यासाठी नाही. महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल, तर पाय अडकून पडाल, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी राज्यपालांच्या दौऱ्यावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्यपालांचे घटनाविरोधी कृत्य सुरु आहे. राज्यपालांनी त्यांचं काम करावं. भाजपशासित राज्यातील राज्यपाल दौरे का काढत नाहीत? आपलेच राज्यपाल दौऱ्यावर का जात आहेत? त्यांना कुणाची फूस मिळत आहे का? हे पाहावे लागेल.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजय सरकारची राजकीय कारणासाठी अडवणूक आणि हस्तक्षेप करु नये, त्यांनी त्यांचं काम करावं, असेही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT