sanjay raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीपूर्वी गोध्राची पुनरावृत्ती? राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती; म्हणाले, राम मंदिर...

रोहित कणसे

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात करण्यात आली आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवसांनी (३१ ऑगस्ट) मुंबई येथे महत्वाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी मोठा हल्ला घडवला जाऊ शकतो असा दावा संजय राऊतांनी केला आहे. देशात अनेक प्रश्न आहेत मात्र फक्त धार्मिक तेढ निर्णाण करून निवडणूकांना सामोरं जायचं हा एक कलमी अजेंडा भाजप राबवत असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. या मुद्द्यावर मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.

आम्हाला भीती वाटते जसं गोध्रा केलं असं म्हणातात, त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी देशभरातून ट्रेन्स आयोध्येला बोलवून, एकाद्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडवून देशात धर्मांधतेचा आगडोंब तर उसळवणार नाहीत ना? अशी भीती लोकांना वाटत आहे. हे काहीही करू शकतात. जर पुलवामा घडवलं जाऊ शकतं असं म्हणतात, गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात आहे. तर अशाच प्रकारचं कृत्य २०२४ च्या निवडणूका जिंकण्यासाठी केलं जाऊ शकतं अशी भीती देशातील प्रमुख राजकीय पक्षांना वाटत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. अशी भीती जनतेला देखील वाटत आहे. पण आम्ही अत्यंत सावध आहोत असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT