Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : हक्कभंग नोटिशीला राऊतांकडून अजून उत्तर नाही; आता पुढे काय होणार?

विधीमंडळ हे चोरमंडळ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान केलं होतं. या विधानामुळे राऊत चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांना पाठवलेल्या हक्कभंगाच्या नोटीसला त्यांनी अद्याप उत्तर न दिल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असं विधान करून संजय राऊतांनी वाद ओढवून घेतला आहे. याबद्दल राऊतांना हक्कभंग नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र राऊतांनी त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे.

विधिमंडळाने संजय राऊतांना ४८ तासांमध्ये आपलं म्हणणं लेखी मांडण्याची नोटीस दिली होती. शुक्रवारी संध्याकाळी संजय राऊतांची खुलासा सादर करण्याची मुदत संपली आहे. पण त्यांनी कोणतंही लेखी उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आता विधिमंडळाकडून पुढील कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संजय राऊतांना विधिमंडळाकडून स्मरण पत्र पाठवलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT