Sanjay Raut on Devendra fadnavis e sakal
महाराष्ट्र बातम्या

'सत्यमेव' काय असते हे फडणवीसांना माहीत आहे का? - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : हे राजकारण असून लोकशाही घटनेची गळचेपी आहे. सत्यमेव काय असते हे देवेंद्र फडणवीस यांना तरी माहीत आहे का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना केला आहे. भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

निलंबन रद्द करण्याचा अधिकार हा अध्यक्षांचा असतो - संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाने आज भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. मला वाटते निलंबन रद्द करण्याचा अधिकार हा अध्यक्षांचा असतो. विधानसभा अध्यक्षांवर न्यायालयाचा दबाव बंधनकारक आहे का हे पाहावे लागेल. न्यायालयाचे दिलसे एकाच पक्षाला का असतात. 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब का लागतो, न्यायालय यावर बोलणार आहे का?

हे राजकारण आहे. लोकशाही घटनेची गळचेपी

हे राजकारण आहे. लोकशाही घटनेची गळचेपी आहे. ही कसली चपराक आहे. जे आता आनंद साजरा करत आहेत. त्यांना पुढच्या अधिवेशनात कळेलच अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने?

वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केलं. कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही. असा निर्णय घेणं असंविधानिक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी संपली तरीही गिफ्टचा धडाका सुरूच! आणखी विशेष गाड्यांची घोषणा; रेल्वेचा मोठा निर्णय

फक्त मराठीत नाही तर या प्राचीन भाषेतही रिलीज झाला अभंग तुकाराम सिनेमाचा टीझर !

Phaltan Doctor Case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन; फरार आरोपींचा शोध सुरु

दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री अनुजा साठेने मुंबईत घेतलं नवं घर ! शेअर केली नव्या घराची झलक

Mumbai Crime: मुंबईत दिवसाढवळ्या थरार! जीव मुठीत घेऊन रस्त्यावर पळत सुटली पण...; प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT