Sanjay Raut Santosh Bangar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : "संजय राऊत डाकू आहे" म्हणत संतोष बांगरांची शिवीगाळ

राज्यातलं विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान आज सकाळी संजय राऊत यांनी केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

खासदार संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान आज दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातलं विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान राऊतांनी केलं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ माजला, राऊतांवर हक्कभंग प्रस्ताव आणला आणि विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब झालं.

दरम्यान, शिवसेनेने आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. तसंच त्यांना शिवीगाळही केली आहे.

सभागृहातलं कामकाज तहकूब झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजीही केली. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत हा डाकू आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. तसंच त्यानंतर संजय राऊत यांना शिवीगाळ केली.

बांगर म्हणाले, "संजय राऊत आमच्या मतांवर निवडून येतो आणि आम्हालाच चोर म्हणतो. मला वाटतं हा संजय राऊत डाकू आहे. त्याच्यावर ३९५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा. संजय राऊत आम्हाला ज्या पद्धतीने चोर म्हणतायत. मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही त्यांनी चोर म्हटलं आहे. अशा ह***** महाराष्ट्रातली जनता फिरू देणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT