संजय राऊत 
महाराष्ट्र बातम्या

सोमय्यांवर कारवाई कुणाच्या आदेशाने? संजय राऊतांनी दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

किरीट सोमय्यांना कोल्हापुरात जाण्याआधीच रोखण्यात आलं. कऱ्हाडमध्येच त्यांना उतरवून पोलिसांनी ताब्यात घेतलं.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कऱ्हाडमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला. मुश्रीफांचा दुसरा घोटाळा हा १०० कोटींचा असल्याचं सोमय्यांनी म्हटलं. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, केंद्राच्या इशाऱ्याने राज्य सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पुरावे असतील तर राज्यातील यंत्रणांकडे तक्रार करा. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील नेत्यांवर आरोप केले जात आहेत.

किरीट सोमय्यांना कोल्हापुरात जाण्याआधीच रोखण्यात आलं. कऱ्हाडमध्येच त्यांना उतरवून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत सोमय्यांनी मुश्रीफांवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला. दरम्यान त्यांच्यावर कऱण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारले असता राऊतांनी म्हटलं की, गृहामंत्रालयाने केलेली कारवाई ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली असं म्हणणं चुकीचं आहे. आरोप करण्याचे पुरावे असतील तर पोलीस दल किंवा इतर संस्था यांच्या पुरावे द्यावे. गृहमंत्रालयाचे कायदा सुव्यवस्था राखण्याचा काम आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही.

किरीट सोमय्या यांच्याकडून घोटाळे उघड करण्यासाठी प्रत्यक्षात नेत्यांच्या जमिनी, कारखाने यांची पाहणी केली जाते त्यावरही राऊतांनी टोला लगवाला आहे. त्यांनी म्हटलं की, 'तुम्ही चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी आहेत का पाहाव्यात.' हिरव्या रंगावरून सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की, 'कोणता रंग ते त्यांना कळेल. कायदेशीर कारवाई करताना रंग पाहिला जात नाही. शिवसेनेवर अशा प्रकारचे आरोप करण्याआधी त्यांनी स्वत:चे अंतरंग पहावेत.'

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धमक्या

राज्यातील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लागत असल्याबद्दल राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढवून, संपत्ती जप्त करण्याची धमकी, कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत. अशाने महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होईल असं वाटत असेल तर तसं काही होणार नाही. हे सरकार डरपोक नाही. आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले मर्द मावळे. तुम्ही कितीही हल्ले करा, पाठीमागून वार करा पण आम्ही झुकणार नाही असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.

भाजपात गेल्यावर हरिश्चंद्राचे अवतार झाले

नारायण राणे यांच्या बंगल्यावरून सोमय्यांनी आरोप केले होते. महाराष्ट्रात अनेक लोक आणि कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावर आधी आरोप केले आणि आता भाजपात गेल्यावर ते हरिश्चंद्राचे अवतार झाले. आरोप प्रत्येकावर होतायत, मोदी, अमित शहा आणि भाजप शासित राज्यांमध्येही होतायत. आरोप करणं ही फॅशन झालीय असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT