संजय राऊत  File photo
महाराष्ट्र बातम्या

सोबत आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर...- राऊतांचा राष्ट्रवादी-काँग्रेसला इशारा

नामदेव कुंभार

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भोसरी येथे बोलताना कार्यकर्त्यांना एकटं लढण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. भोसरीतील गोविंद गार्डन कार्यालयात सुरु असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. यावेळी राऊत यांनी चौफेर टोलाबाजी केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेतला. शिवया पालकमंत्री अजित पवार यांच्या दराऱ्याला घाबरु नका, असेही कार्यकर्त्यांना सांगितलं. सोबत आलात तर तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय, असं अप्रत्यक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना राऊत यांनी सुनावलं आहे.

आगमी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या. पिंपरी चिंचवडमध्ये कोणाचे कितीही नगरसेवक आले तरी नगरसेवक सेनेचाच झाला पाहिजे, त्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केलं. तसेच आपल्याला एकत्र काम करायचे आहे म्हणत, आमच्या लोकांना नाराज करु नका, असे आवाहन अजित पवार यांना केलं. तसेच त्यांनी जर ऐकले नाही, तर मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत असे म्हणत त्यांनी मिश्किल शेरेबाजी केली आहे.

महापालिका आली की आपल्या फुग्यातील हवा का जाते? असा सवालही संजय राऊत यांचा शिवसैनिकांना विचारला. तसेच आगामी महामालिका निवडणुकीच्या कामाला लागा, अशी सूचनाही यावेळी राऊत यांनी केली. पुणे, पिंपरी-चिंचवडचा महापौर शिवसेनाचा असावा, असेही राऊत यांनी सांगितलं.

शिरूर लोकसभा आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. २६)भोसरीतील गोविंद गार्डन कार्यालयात सुरु आहे. यामध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत आगामी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहीर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, राज्य संघटक गोविंद घोळवे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात मनसेकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी करण्यात आली सोय

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT