Sanjay Raut  Sakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊत जेलमध्ये बसून लिहितायत पुस्तक; जाता जाता माध्यमांशी बोलले!

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कारागृहात आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आता ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या जेलमध्ये बसून एक पुस्तक लिहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना वर्तमानपत्र वाचण्यासाठी मिळत आहे. ते त्यातल्या बातम्यांच्या आधारे आपले विचार एका वहीत लिहून ठेवत आहेत. तसंच टिपणंही काढत आहेत. काही पुस्तकंही त्यांना वाचायला मिळाली आहे.

दरम्यान, राऊत सध्या जेलमध्ये स्वतःचं एक पुस्तकही लिहित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्यावर दाखल झालेल्या खटल्यांबद्दलचं हे पुस्तक असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर राऊतांनी जाताजाता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, ही सगळी केस खोटी आहे. माझा काही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक आहेत. मी फक्त दोन जणांना ओळखतो. सच के साथ लढ सकते है, झूठ के साथ नही. जेलमध्ये नियमांनुसार वर्तमानपत्रं मिळतात. माझी तब्येत सध्या चांगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT