Shivsena 
महाराष्ट्र बातम्या

हीच ती 'वेळ' बनवा सरकार; 'मातोश्री'वर आज वाघांच्या जोरबैठका 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मागील पाच वर्षे सत्तेत राहूनदेखील सातत्याने अवमान सहन करणारी शिवसेना याखेपेस मात्र वचपा काढण्याच्या तयारीत आहे, स्वबळावरील बहुमतापासून 
40 जागा दूर असलेल्या भाजपला राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या वाघांची मनधरणी करावी लागेल. शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी "हीच ती वेळ', असे म्हणत महाआघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवा, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे. या संदर्भात चाचपणी करण्यासाठी आज (ता.26) रोजी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची मातोश्री येथे बैठक होणार आहे. 

दरम्यान, भाजप व शिवसेनेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून, अपक्षांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युतीच्या उमेदवारांविरोधात बंड करून विजयी झालेल्या बंडखोर आमदारांचाही भावही यामुळे चांगलाच वधारला आहे. दरम्यान, शिवसेनेचे अनेक आमदार शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा, अशी भूमिका मांडत आहेत; तर उद्धव ठाकरे यांनी आम्ही भाजपच्या सर्वच अडचणी सहन करू शकत नाही, असा सूचक इशारा भाजप नेत्यांना दिला आहे. राज्यभरात शिवसेनेच्या विरोधात भाजपने जवळपास 42 जागांवर बंडखोर उभे केले होते. या सर्व बंडखोरांना पक्षाकडून सर्व ताकद देण्यात आल्याचा शिवसेनेच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे आता परत भाजपसोबत सत्तेत गेल्यास पुढील पाच वर्षे शिवसेनेला सावत्रभावाची वागणूक मिळेल, याची धास्ती शिवसेना आमदारांना आहे. 

काँग्रेसचा प्रस्ताव 
या अस्थिर परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तर शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आल्यास जरूर विचार करू, असे स्पष्ट केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता स्थापनेत आम्ही लक्ष घातलेलं नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा कौल दिल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आता भाजपच्या एककेंद्री राजकारणाला बळी पडणार नसल्याचे संकेत दिल्याने सत्तेची नवी समीकरणे पुढे येऊ शकतात. 

उद्धव ठाकरेंशी शहा चर्चा करणार 
राज्यामध्ये भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यापूर्वी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धच ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. शिवसेनेला सत्तेत अधिक झुकते माप देऊन हा तिढा सोडविण्याचा शहा यांचा विचार आहे; पण शिवेसना यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT