Samana_Modi 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena on Hindenburg: चोर अन् चौकीदार एकत्र! ईडी-सीबीआय झिंगून पडलेत; शिवसेनेचा हिंडेनबर्ग प्रकरणावरुन हल्लाबोल

हिंडेनबर्ग रिसर्चनं नवा खुलासा केल्यानं सरकार आणि सेबी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चनं नवा खुलासा केल्यानं सरकार आणि सेबी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सेबीच्या अध्यक्षांचा अदानींच्या शेअर मार्केट घोटाळ्यात हात असल्याचं या नव्या अहवलानं म्हटलं आहे. या प्रकरणावरुन आता देश पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. त्यामुळं शिवसेनेनंही यावरुन केंद्र सरकारनं जोरदार हल्लाबोल केला आहे.

चोर आणि फौजदारानं देश लुटला असून ईडी आणि सीबीआय झिंग येऊ पडले आहेत, त्यामुळं त्यांना ही लूट दिसत नाहीए, अशा शब्दांत शिवसेनेनं अदानी, सेबी, केंद्र सरकार त्याचबरोबर ईडी-सीबीआय या तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला आहे.

हिंडेनबर्गचा नवा रिपोर्ट समोर येताच सेबीच्या प्रमुख माधवी बूच यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता. जर त्या राजीनामा देत नसतील तर अर्थमंत्री निर्मला सातीरामन यांनी त्यांना तात्काळ पदावरुन दूर करायला हवं होतं, असंही सामनानं आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे. या प्रकरणात माधवी बूच यांनी आरोप फेटाळून लावताना आपलं चारित्र्यहननं होत असल्याचं तुणतुण त्या वाजवत आहेत. तर केंद्रातील मोदी सरकारनं यावर नेहमीप्रमाणं मौन बाळगलं असून हे गंभीर आहे.

शेअर बाजारात घोटाळा होऊनही अदानींवर कारवाई झाली नाही की सेबीच्या अध्यक्षांची हाकालपट्टी. सरकारच चोरांचे भागीदार झाल्यानं दुसरं होणार तरी काय? असा सवाल करत आपल्या देशावर सध्या चोरांचं राज्य आहे. देशाची ओळखच सध्या सरकार पुरस्कृत घोटाळेबाजांचा देश अशीच होताना दिसत आहे, शिवसेनेनं आपल्या मुखपत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT