Uddhav Thackeray Eknath Shinde Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "ज्याची भिती होती..."; सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं.

दत्ता लवांडे

मुंबई : "मला त्याबद्दल जास्त माहिती नाही, पण असंच घडेल असं माझं मन मला सांगत होतं. ज्याची भिती होती तोच निर्णय देण्यात आला. आता चिन्ह असो किंवा नसो पण उद्धव ठाकरेंनी निवडणुकांना पुढे जाण्याची तयारी दाखवली पाहिजे, कारण मीही वेगवेगळ्या निवडणूक चिन्हावर लढलो. या निर्णयामुळे शिवसेना तर अजिबात संपणार नाही, ती अजून जोमाने उभी राहील" असं मत राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यावर व्यक्त केलं आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

(Sharad Pawar After Shivsena Party Symbol Frozen by EC)

"निवडणूक चिन्हाचा निर्णय आला असला तरी महाविकास आघाडी फुटणार नाही, आम्ही सोबत असणार आहोत. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं असू शकते, कारण काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हाही दोन नावे देण्यात आले होते. सत्तेचा गैरवापर करून कुणी निवडणुका लढवत असेल तर ते लोकांना आवडत नाही" असाही टोला पवारांनी भाजपवर लावला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आपली आणि पक्षचिन्ह आपलंच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. तर आता निवडणूक आयोगाने शनिवारी निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. त्याचबरोबर शिवसेना नावही कुणालाच वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी दुसरे चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाने केलीआहे.

'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' याच नावावर दोन्ही गटाचा दावा

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने "शिवसेना बाळासाहेब ठाकरे" या नावाचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे पुन्हा पेच निर्माण झाला असून कोणते नाव कोणत्या गटाला मिळणार याकडे लक्ष लागलेल आहे. तर ज्याची भिती होती तोच निर्णय निवडणूक आयोगाने दिला अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT