Uddhav Thackeray and Sanjay Gaikwad 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : खेकड्यांनीच चमत्कार दाखवला; संजय गायकवाड यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

रवींद्र देशमुख

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना पॉडकास्टमध्ये सोडून गेलेल्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना खेकड्यांची उपमा दिली. तसेच खोकड्यांनीच पक्ष फोडल्याचं म्हटलं होतं. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं.

आमदार गायकवाड म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत प्रसिद्ध झाली, त्यात मनातली मळमळ, जळजळ होती. ती सगळी तोंडातुन बाहेर पडताना दिसत आहे. पद गेल्याचं खुप मोठं दु:ख उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. रोज एक एक सहकारी सोडुन जात आहे.उद्धव ठाकरे जरी खेकडे म्हणतं असले तरी या खेकड्यांनी चमत्कार करुन दाखवल्याचं गायकवाड म्हणाले.

खेकडे हे आता वाघाच्या भुमिकेत आले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीवारीवर गेले, असले तरी ते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात. आघाडीतील नेते म्हणून त्यांना भेटायला गेले तर त्यात वावगं काय? उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे जायचे तेव्हा किती मुजरे केले? असा सवाल गायकवाड यांनी केला. तसेच ज्याला आपण मारण्याचं षडयंत्र केलं होतं. तोच आपल्या छाताडावर मुख्यमंत्रीपदी बसला हे ठाकरेंना बघवत नाही, असंही गायकवाड यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT