Shivsena Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Political Crisis: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला! या तारखेला लागणार निकाल

Shivsena Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. तर निकाल कोणत्या दिवशी आणि किती वाजता लागणार याबाबतची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार असून तो दिवस आता जवळ आला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. दरम्यान हा निकाल कोणत्या दिवशी किती वाजता लागणार याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रूटी दूर करण्याचे काम सुरु असून निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि खासदार यांनी शिवसेनेत बंड केलं. अनेक आमदार खासदारांनी शिंदेंना साथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमच्याकडे आमदार आणि खासदार संख्या जास्त असल्याने शिवसेना पक्ष आमचा असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यानंतर पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नावावर देखील शिंदे गटानं दावा केला. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. तेव्हापासून खरी शिवसेना कोणाची याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.

22 जून 2022 पासून राज्यात सूरू असलेल्या राजकीय घडामोडी आजही चांगल्याच चर्चेत आहेत.

राहुल नार्वेकर-मुख्यमंत्री शिंदे यांची निकालाआधी भेट

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली . दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल येण्याआधी ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रते प्रकरणी काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT