Amit Shah Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: आम्ही आता मोदींचा फोटो लावत नाही, तुमच्या बॅनरवर बाळासाहेब का? सेनेचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग काढत उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज ते पदाधिकाऱी मेळाव्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. मात्र त्याआधी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेला मुंबईच्या विकासासाठी मुंबई महापालिकेची सत्ता हवी आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचं केंद्रीय नेतृत्व मुंबईत आलं होतं. त्यांनी मुंबईत म्हटलं देखील मुंबई काबीज करण्याचं आमचं फार-फार जुनं स्वप्न आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उपस्थितांना आठवण करून दिला.

भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच कौतुक केलं आहे. १९९२ ची दंगल झाली. त्यावेळी शिवसेनेने मुंबई वाचवली. उध्दव ठाकरे यांच्याविषयी सर्व धर्मांमध्ये आदर आहे. ४० गद्दारांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. उलट आजारी असताना गद्दारांनी उद्धव साहेबांच्या मागे ताकदीने उभं राहायला पाहिजे होतं, असंही भास्कर जाधव म्हणाले.

भाजपवाले म्हणतात, शिवसेनेने नरेंद्र मोदींचा फोटो वापरून मतं मागितले. पण तुम्ही सुरुवातीपासून बाळासाहेबांचा फोटो वापरला हे कधी सांगणार, असा सवाल जाधव यांनी केला. तसेच आता देखील गद्दारांच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो दिसतो, पण शिवसेनेच्या कोणत्याही बॅनरवर नरेंद्र मोदींची फोटो नाही, असं जाधव यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT