chandradip narke from uddhav thackeray faction joins eknath shinde in kolhapur maharashtra politics  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Row : चिन्ह व नाव तर शिंदेंकडे गेलं; आता शिवसेना भवन कोणाकडे जाणार?

शिवसेना भवन हे सेनेचं मुख्यालय असलं तरी त्याची मालकी पक्षाकडे नाही.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेसाठीचा संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा वाद सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. मात्र आता शिवसेना भवन कोणाकडे जाणार हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले. पण बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर इथलं शिवसेना भवन अजूनही उद्धव ठाकरेंकडेच आहे. 'साम'ने दिलेल्या माहितीनुसार, हे शिवसेनेचं मुख्यालय असलं तरी त्याची मालकी पक्षाकडे नाही, तर उद्धव ठाकरेंकडेच आहे. त्यामुळे शिंदे गट त्यावर दावा सांगू शकणार नाही.

शिवसेना भवन हे सध्या शिवाई ट्रस्टच्या नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या एका ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी यासंदर्भातला एक कागदही ट्विटरवरुन शेअर केला आहे.

दरम्यान, चिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळणार याची कुणकुण लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षनिधी इतर बँक खात्यात वळवला असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT