sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

अन्वय नाईक मृत्यू प्रकरण: भाजपच्या दबावामुळेच आत्महत्या-संजय राऊत

शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या लढाईत नवनवीन आरोपांची भर पडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपच्या दबावामुळे आत्महत्या केली असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी केला. पत्रकार अर्णव गोस्वामींना वाचविण्यासाठी मराठी उद्योजक असलेल्या अन्वय नाईक यांच्यावर दबाव आणणाऱ्यांमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचाही समावेश असल्याची नवीन माहिती आपल्याकडे आली असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या लढाईत नवनवीन आरोपांची भर पडत आहे. संजय राऊत म्हणाले, की अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, बिल पाठवायचे नाही, यासाठी किरीट सोमय्यांनीदेखील अन्वय नाईक यांना धमकावल्याची माझ्याकडे माहिती आहे. नाईक यांना दोन वेळा बोलावून त्यांना धमकावण्यात आले. त्यानंतर आत्महत्येची घटना घडली. भाजपच्या लोकांनीच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सोमय्या यांनी आज सकाळी रायगड येथील कोर्लई गावातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला भेट दिली. वादग्रस्त जमिनीवरील बंगल्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ते जाणार होते. याबाबत राऊत यांना विचारले असता, ‘कोण आहेत किरीट सोमय्या? वेडा माणूस इकडे -तिकडे फिरत आहेत. ते तुरुंगात जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत. येथील जनता त्यांची धिंड काढेल, असे सांगत ‘थांबा आणि पहा, असा इशारा देखील दिला.

वादग्रस्त बंगल्यांच्या बाबत बोलताना, ‘‘कुठे बंगले आहेत हे दाखवा. तेथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. त्यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटले आहे. त्यांची बेनामी संपत्ती कुठे असेल तर ती स्वप्नात दिसत असेल,” अशा शब्दात राऊत यांनी सोमय्या यांना लक्ष्य केले.

अक्षता नाईक यांनी सोमय्यांना फटकारले

‘‘कोर्लई गावातील जमिनीवर ठाकरे परिवाराचे १९ बंगले आहेत. १९ कशाला हा उद्या म्हणेल तिथे हजार बंगले होते. या जमिनीत हिऱ्याची खाण आहे. तो ज्या पद्धतीने या प्रकरणात रस घेत आहे. त्यावरून असे वाटते की याला वॉचमनची नोकरी द्यावी, निदान तो त्या जमिनीची देखरेख तरी करेल,’’ अशा शब्दात अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी किरीट सोमय्या यांना फटकराले. कोर्लई गावाला सोमय्या यांनी भेट दिल्यानंतर अक्षता नाईक यांनी शिवसेनेची पाठराखण करत भाजपवर ताशेरे ओढले. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने उभे राहायचे सोडून गुन्हेगाराला पाठीशी घातले गेल्याची टीका त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर केली.

गृहमंत्र्यांकडे तक्रार

अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडत किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळे आम्हाला मानसिक त्रास होत असल्याची तक्रार केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT