Sanjay Raut tweet marathi news Sanjay Raut tweet marathi news
महाराष्ट्र बातम्या

राज्याचे तुकडे करण्याआधी सेनेचे तुकडे; राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीत दाखल झाले असून, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी शिंदेच्या या दौऱ्याला अधिक महत्त्वा प्राप्त झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काल रात्री दिल्लीत दाखल झाले असून, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी शिंदेच्या या दौऱ्याला अधिक महत्त्वा प्राप्त झाले आहे. या सर्वामध्ये आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राज्याचे तीन तुकडे करण्यापूर्वी भाजपने शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी त्याचे तुकडे करण्याचा डाव आखल्याचा हल्लाबोल केला आहे. फक्त आमदार खासदारच सेनेची ताकद नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बंडामुळे शिवसेनेची ताकद कमी होणार नसल्याचेही ते म्हणाले. (Sanjay Raut Latest News In Marathi)

खासदारांच्या घराला सुरक्षेसाठी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दिल्ली दौरे होणारच असेही राऊत म्हणाले. सत्तास्थापनेनंतर उद्भवलेल्या संघर्षात आतापर्यंत शिवसेनेलाच धक्क्यांवर धक्के बसत आहेत मात्र, शिवसेना कोणत्याही संघर्षाला दोन हात करण्यासाठी समर्थ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच जे होईल ते पाहून घेऊ असे विधानही राऊतांनी केले आहे.

महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत हे भाजपचे नेतेच सांगत आहेत. मात्र, राज्याचे तीन तुकडे करण्यापूर्वी भाजप शिवसेनेचे तुकडे करू पाहत आहे. जर महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर त्याआधी शिवसेनेचे तुकडे करा अखंड शिवसेना फोडा, सेनेची ताकद कमी करण्याचा डाव आखण्याचा प्रयत्न आहे. मात्र, शिवसेनेच्या चिन्हावर जे निवडून आले आहेत त्यांनी जरी आज पाठीत खंजीर खूपसण्याचा प्रयत्न केला आहे असे असले तरी शिवसेनेची ताकद काही केल्या कमी होणार नाही. कारण आमदार आणि खासदारच शिवसेनेची ताकद नसून, शिवसेना या सर्वातून पुन्हा उभी राहिल असा विश्वास राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच ज्यांच्या घराबाहेर आज चौकी पहारे लागले आहेत. त्यांना कोणत्याही सभागृहात येण आम्ही कठीण करू असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT