Sanjay Raut Detained
Sanjay Raut Detained esakal
महाराष्ट्र

'मैत्री' बंगल्यावरील ED कारवाईदरम्यान काय झालं? सुनिल राऊतांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली, त्यानंतर राऊत यांना ताब्यात घेण्यात आले आहे, यादरम्यान ईडीने ताब्यात घेतल्यानंतर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असून शिवसेनेला कमकुवत करण्याचा हा डाव असल्याचे संजय राऊत म्हणालेl. विशेष म्हणजे आज सकाळी ७ वाजता ईडी संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर पोहोचली होती.सुमारे नऊ तासांच्या कारवाईनंतर संजय राऊतांना ताब्यात घेण्यात आले. या छापेमारीदरम्यान काय झालं याबद्दल संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी माहिती दिली. (Sanjay Raut Detained by ED)

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी ईडीकडून नेमकी काय कारवाई करण्यात आली याबद्दल माहिती दिली ते म्हणाले की, संजय राऊत झुकणार नाहीत. त्यांच्यावर जी कारवाई झाली ती चुकीची आहे. संजय राऊत अटकेला तयार आहेत. खोट्या आरोपाखाली त्यांना फासावर लटकवलं तरी ते झुकणार नाहीत. ते शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना सोडणार नाहीत. संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहतील.

संजय राऊतांचे घर मैत्री या बंगल्यावक छापा टाकण्यात आला होता, त्याबद्दल माहिती देताना सुनिल राऊत म्हणाले की, त्यांनी मैत्री बंगल्यामध्ये तपास केला. माझ्या तिन्ही फ्लोअरची तपासणी केली. जेवढे कागदपत्रं हवे होते, तेवढे त्यांनी घेतले आहेत. आम्ही ती कागदपत्रे त्यांना अगोदरच दिली होती असे सुनिल राऊत म्हणाले.

दरम्यान बदल्याच्या भावनेने माझ्यावर कारवाई केली जात आहे. माझ्यावर कारवाई केल्याने शिवसेनेला व महाराष्ट्राला लढण्याचे बळ मिळत असेल तर मी बलिदान द्यायला तयार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे .

शिवसेनेला (Shiv sena) संपवण्यासाठी कारवाई केली जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कसे लढायचे हे मला माहिती आहे. संघर्ष करण्याचे गुण आमच्यात आहे. मी घाबरणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. मी वेळ वाढवून मागितला होता. परंतु, कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी घरात घुसले, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid: सिंगापूरनंतर भारतातही परसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

Nigeria Firing: अमानुष! बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात ४० लोक ठार; पीडित म्हणाले, त्यांनी आमची...

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

SCROLL FOR NEXT