nitesh rane esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : "संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाहीत"; नितेश राणेंनी धमकावलं

राज्याचं विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान राऊतांनी केलं आणि मोठा गदारोळ माजला.

सकाळ डिजिटल टीम

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच गाजला. राज्याचं विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान राऊतांनी केलं आणि मोठा गदारोळ माजला. भर अधिवेशनामध्ये भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना यावरुन धमकावलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवसात विविध पक्षीय नेत्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्तावही आणला. या सगळ्या दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख केला आहे. तसंच त्यांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाहीत, अशी धमकीही दिली.

काय म्हणाले नितेश राणे?

आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे? ते सामनात येण्याआधी त्यांचे सगळे लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं, शिवसेनेच्या विरोधात लिहिलं होतं.

संजय राऊतांना धमकावताना नितेश राणे पुढे म्हणाले, "संजय राऊतांना दिलेलं संरक्षण काढा. ते पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतात, सरकारनं दिलेलं संरक्षण आहे ते. १० मिनिटे ते संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT