Sanjay raut eknath shinde
Sanjay raut eknath shinde Sakal
महाराष्ट्र

"शिवसेना आमदार पळून मुंबईला येत होते पण गुजरात पोलिसांनी मारलं"; राऊतांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय नाट्याला क्षणाक्षणाला वेगळे वळण लागत आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसहित सुरतला दाखल झाले आहेत. तर ते भाजपसोबत जाणार असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेच्या आमदारांना मारहाण करण्यात आली असून काही आमदारांचे अपहरण करण्यात आलं असल्याचा आरोप शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला आहे.

(Sanjay Raut On Eknath Shinde)

"आमच्या आमदारांचं अपहरण करण्यात आलं असून त्यांना बळजबरी कोंडून ठेवलं आहे. जवळपास नऊ आमदारांचा मुंखमंत्र्यांना फोन आला असून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. तर काही आमदार महाराष्ट्रात पळून येत असताना त्यांना गुजरात पोलिसांनी मारलं आहे. त्यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे." असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान सध्या सर्वांची धाकधूक वाढली असून राज्यातील सरकारचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपला जाऊन मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच फुट पडल्याचं चित्र उभं राहिलं आहे. तर मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. तर एकनाथ शिंदे आता भाजपसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

रात्री निकाल लागल्यापासून शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची माहिती होती. ते नाराज असून त्यांना समर्थन करणाऱ्या नेत्यांसोबत ते सुरतला पोहोचले आहेत. ते भाजपच्या संपर्कात असून आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर गेले आहेत. त्यांच्या भेटीनंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT