Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: होय, आम्ही मानसिक रुग्ण आहोत, पण...; संजय राऊत असं का म्हणाले?

कलानगर येथून सुरूवात केली कारण कलानगरवर त्याचं प्रेम आहे. सर्व काही कलानगरनेच दिलयं त्यांना. हे ज्या खुर्चीवर बसलेत तेही कलानगरचीच बदोलत, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला

कार्तिक पुजारी

मुंबई- मकाऊ हे निसर्गरम्य क्षेत्र नाही. पण, मानसाने जायला हवं. निरीक्षण केलं पाहिजे. अशाठिकाणी बसणे देखील गुन्हा नाही. पण, खोटं बोलणं गुन्हा आहे. मी पण मकाऊला गेलोय. एक गाव कसं उभ राहतंय हे मी तिथे पाहिलं. भारतीय जनता पक्षाला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

त्या व्यक्तीने साडेतीन कोटी रुपयांचे पोकर्स खरेदी केले. पोकर्स हे गॅमलिंग खेळण्याचे चलन आहे. भाजपच्या लोकांना चांगले दिवस आले आहेत. जे छायाचित्र प्रसिद्ध झालंय, त्यात त्यांचं कुटुंबिय कुठे आहेत? तुम्ही इतकं मनावर का घेताय? तुमची टोलधाड अंगावर का सोडताय? टोलधाड सोडण्यापेक्षा मी तिथे पाहिला गेलो हे सांगता आला असतं, असं राऊत म्हणाले.

लंडनला महाराष्ट्राचं शिष्टमंडळ गेलं. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी गेलं तर त्यात काही चुकीचं नाही. पण, तुम्ही नाकारताय कशाला? खोटं कशाला बोलताय? आदित्य ठाकरे डायट कोक पिताना दिसत आहेत. आपण काय पोस्ट करतोय याचं भान देखील भाजपला राहिलं नाही.माझ्याकडे मोदींचे फोटो आहे ते मी टाकू का? असा सवाल राऊतांनी केला.

टोलधाड मला धमकी देताहेत. समोर या, तोंडपाटीलकी करु नका. मानसिकदृष्ट्या आम्ही कमजोर आहोत. कारण, आमची मानसिकता महाराष्ट्राच्या संस्कृतीचं संरक्षण करणे ही आहे. भाजपसारख्या लोकांसोबत संघर्ष करण्याची आमची मानसिकता आहे. देशाला वाचवण्याची आमची विकृती आहे. संस्कृतीचे रक्षण हीच आमची मानसिकता आहे, असं राऊत म्हणाले.

ही भारतीय जुगार पार्टी आहे.नैतिकतेच्या नावावर दुसऱ्यांच्या घरी एजेन्सी पाठवली जाते आहे. एजेन्सीचा वापर करुन नेत्यांवर दबाव आणला जात आहे. मानसिक रुग्ण कोण आहे? विकृत कोण आहे?हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मुंबई आणि महाराष्ट्र कोणाच्याही घशात घालू देणार नाही, असं राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदी सांगतात पवारांनी ७० हजार कोटीचा घोटाळा पवार यांनी केला. त्याच पवारांना मोदी मांडीवर घेऊन बसले. यावरून दिसतं कोण मनोरुग्ण आहे. ते फडणवीस याचं असं झालयं की स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून. मुख्यमंत्र्यांनी मुंबई साफ करवी लवकरच महाराष्ट्राची जनता त्यांना साफ करेल. कलानगर येथून सुरूवात केली कारण कलानगरवर त्याचं प्रेम आहे. सर्व काही कलानगरनेच दिलयं त्यांना. हे ज्या खुर्चीवर बसलेत तेही कलानगरचीच बदोलत, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT