Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

लवकरच महाराष्ट्राचं वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेल - संजय राऊत

घटनेची पायमल्ली होऊ नये ही जबाबदारी राष्ट्रपतींची असल्याचं मत राऊतांनी व्यक्त केलं

दत्ता लवांडे

मुंबई : काल द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून यावेळी संपूर्ण देश मुर्मूंकडे आशेने पाहतोय. घटनेची पायमल्ली होऊ नये ही जबाबदारी राष्ट्रपतींची असल्याचं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर तुम्हाला लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

(Sanjay Raut And Shivsena Latest News Update)

शिवसेनच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा लावल्या जात आहेत. आम्ही शिवसेनेसोबत आहोत असं शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. लवकरच तुम्हाला महाराष्ट्राचं वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेलं असं संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती राऊतांनी दिली आहे.

देशभरातून राष्ट्रपतीपदासाठी मतदान झालं त्यामध्ये शिवसेनेचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच घटनेची पायमल्ली होऊ नये हे काम राष्ट्रपतींनी केलं पाहिजे, त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग होत आहे. राजकीय दबावातून सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याच्या विरोधात अशा कारवाया केंद्र सरकारकडून केल्या जात आहेत अशी माहिती राऊतांनी दिलेली आहे.

दरम्यान, काल राष्ट्रपतीपदाची मतमोजणी पार पडली. यावेळी शिवसेनेने विरोधात असूनसुद्धा एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्ट रोजी निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये भाजपकडून जयदीप धनखड आणि विरोधीपक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT