Santosh Bangar Sakal
महाराष्ट्र बातम्या

गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, अंगावर भगवे कपडे अन् हातात झांज; ठाकरेंच्या सभेनंतर बांगरांची कावड यात्रा | Santosh Bangar Video

सकाळ डिजिटल टीम

कळमनुरी : हिंगोलीत काल शिवसेना उद्धव बळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी शिंदे गटातील नेत्यांवर त्यांनी निशाणा साधत जोरदार टीका केली. ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी आज आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढून आपलं शक्ती प्रदर्शन केलं आहे. त्यांच्या कावड यात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आज श्रावण महिन्यातला सोमवार असल्याने त्यांनी यात्रा काढत महादेवाला अभिषेक केला. त्यांच्या गळ्यात आणि दंडावरही कवड्यांच्या माळा, अंगावर भगवे कपडे, गळ्यात फुलांचे हार, हातात झांज वाजवत त्यांची ही कावड यात्रा निघाली होती.

मध्येच कार्यकर्त्यांकडून हार घालून सत्कार करण्यात येत होता. तर तलवार म्यानातून काढत, दंड थोपटत त्यांनी आपलं शक्तिप्रदर्शन केलं. या यात्रेसाठी विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. कार्यकर्त्यांच्या लांबपर्यंत लागलेल्या रांगा या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. "काही गद्दार आम्हाला बेडकुळ्या दाखवत आहेत." अशी टीका काल उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर म्हणून बांगर यांनी आज या यात्रेमध्ये बेडकुळ्या दाखवल्या आहेत.

दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांनी "मटक्याचा धंदा करणारा हिंदुत्ववादी कसा असू शकतो, गद्दार अनेक झाले पण हिंगोली कायम शिवसेनेच्या मागे उभी राहिली. आजही काही गद्दार आहेत. बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेडकुळ्यांमध्ये हवा आहे. ताकद माझ्याकडे आहे. मागे नागपंचमी झाली, या गद्दाराची नाग समजून आपण पूजा केली पण तो उलटा फिरून डसायला लागला." अशा शब्दांत नाव न घेता संतोष बांगर यांच्यावर टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave Alert : जानेवारीतही थंडीची लाट राहणार; पुढच्या तीन महिन्यांचा हवामान अंदाज आला समोर

Latest Marathi News Live Update : बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी घेतला पुढाकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले सक्रिय

बॉलिवूडच्या खलनायकानं साकारलेली नायकाची भूमिका, 15 मिनिटात सिनेमा थिएटरमधून बाद, कोणता आहे 'तो' सिनेमा?

माेठी बातमी! राज्यातील दूध उत्पादक संकटात; खरेदी दरात सहा महिन्यांपासून वाढच नाही, पशुखाद्याचे दर वाढले

Vishwas Patil: ‘संभाजी’ पुस्तकातील चूक सुधारण्याची तयारी: संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांची स्पष्टोक्ती, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT