cm eknath shinde on uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : ''शिंदे गटाचं विसर्जन होणार, भाजपकडून तयारी पूर्ण'', ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचं विधान

संतोष कानडे

पुणेः राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप या शब्दाला आता फारसा अर्थ उरलेला नाही. कारण २०१९पासून महाराष्ट्राने जे काही धक्के पचवले आहेत, त्याला तोड नाहीत. त्यातच आज ठाकरे गटाच्या खासदाराने एक विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होतय.

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार विनायक राऊत हे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले की, कितीही फोडाफोडी झाली आणि कुणीही एकत्र आलं तरी महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये मोठं यश मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत, त्यामुळे काहीही चिंता नाही.

विनायक राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गटाची कितीही पोपटपंची सुरु असली तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. उलट भाजपकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी सुरु झाली आहे. असं म्हणून राऊतांनी राजकीय वर्तुळाच चर्चा घडवून आणली.

''शिंदे गटातील आमदार आमच्याशी संपर्कात आहेत. परंतु ते गद्दारी करुन तिकडे गेल्यामुळे त्यांच्याबबात अजून निर्णय घेतलेला नाही. शिवसेना निष्ठावंतांना पुढे घेऊन जाणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.

राज्यात कधी काय घडेल याचा नेम नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबासह दिल्लीवारी केल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलंय का? अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु नंतर रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT