ujwal nikam 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : अध्यक्षांच्या निर्णयानंतरच सुप्रीम कोर्ट...; सत्तासंघर्षाच्या मुद्दावर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेनेतील बंडानंतर आमदार अपात्रेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून याबाबत हालचाली नसल्याने उद्धव ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारणा केली. यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निकम म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली असे म्हणता येणार नाही. आमदारांच्या अपात्रतेविषयी पूर्ण चौकशी केली की नाही याची विचारणा विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. ठाकरे गटाकडून अपात्रतेबाबत निर्णय देण्यास विलंब होत असल्यामुळे विशिष्ट मुदतीत निर्णय देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी काय प्रगती केली, याबाबत माहिती मागितली आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्यावर मी काही बोलू शकत नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणणं आहे, ते तेच सांगू शकतात. 11 मे रोजी सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करून घ्यावा असं म्हटलं होतं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी चौकशी सुरू केली का? याबाबतची खातरजमा करून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विचारणा केली असावी. कारण, विधानसभा अध्यांना यावर काय म्हणायचं आहे हेही विचारलं आहे. कारण अध्यक्षांच्या म्हणण्यानंतरच न्यायालयाला निर्णय देणार आहे, असही निकम यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT