Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Symbol Hearing : राऊत 40 मिनिटं थांबले अन् अचानक निघून गेले; सुनावणीदरम्यान झालं काय?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर आज त्यासंदर्भात आयोगात सुनावणी सुरु आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आयोगाकडून ऐकून घेतला जात असून काही वेळात यासंदर्भात निर्णय येणार आहे.

सुनावणीसाठी संजय राऊत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पोहोचले होते. तब्बल ४० मिनिटं संजय राऊत आयोगात होते. त्यानंतर ते अचानक निघून गेलं. ४० मिनिटांमध्ये संजय राऊतांना निकालाचा अंदाज आला का? संजय राऊत बाहेर का पडले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

हेही वाचाः योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

बाहेर येत असलेल्या अपडेट्सनुसार एकनाथ शिंदे गटाचं पारड जड दिसत आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून मागील अनेक दिवसांपासून पुरावे दिले जात आहेत. ट्रकच्या ट्रक भरुन पुरावे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आज या प्रकरणी सुनावणी होत आहे.

शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी राजकीय पक्ष म्हणून कायद्यातील तरतुदीनुसार शिंदे गट सरस ठरत असल्याचं म्हटलं आहे तर ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टातील निकालानंतर आयोगाने निर्णय द्यावा, अशी भूमिका मांडली आहे. तरीही निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे काही वेळात समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT