Aditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंना बिनविरोध निवडून आणण्याचे सेनेचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पहिल्या ठाकरेंना आदित्यला बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न सेनेने सुरू केले  आहेत. खासदार संजय राउत यांना ही कल्पना सुचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी तशी चाचपणी केली पण असे घडणे शक्य नसल्याचे उत्तर त्यांना मिळाल्याचेही सांगण्यात येते आहे.

मला शिवसेनेच्या 'स्टाईल'ने काम करायचे आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,' असे सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सोमवारी केली. आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या 66 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. 'मी निवडणूक लढवणार', असे थेट सांगत स्वतः आदित्य ठाकरे यांनीच वरळीतील "विजय संकल्प' मेळाव्यात आपल्या नावाची घोषणा केली. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्‍मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरे मात्र या वेळी उपस्थित नव्हते.  

छावा राजकारणात 
"आपले मंगळयान जरी मंगळावर उतरले नसले तरी हे सूर्ययान 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही,'' अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा छावा आता राजकारणात उतरला आहे. आजपर्यंत ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढले नव्हते. मात्र, इतिहास घडवताना नियम बाजूला ठेवायचे असतात असेही राऊत म्हणाले. "आजचा हा माहौल बघून ट्रम्पदेखील आदित्य यांच्या प्रचाराला येतील. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर आदित्य यांच्याशिवाय पर्याय नाही. आजचा प्रवेश हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,'' असे राऊत यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT