Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र

Shivsena : शिवसेना अन् धनुष्यबाण तर गेलाच... आता उद्धव ठाकरेंची 'मशाल'सुद्धा धोक्यात?

दत्ता लवांडे

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचं हा प्रश्न अखेर सुटला असून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. शिंदे यांच्याकडे आमदारांचं बहुमत असल्याच्या जोरावर त्यांना पक्षचिन्ह आणि नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा खूप मोठा धक्का असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेलं आहे. पण सध्या ठाकरे यांच्याकडे सध्या असलेले 'मशाल' हे चिन्ह आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नावही जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मशाल चिन्ह आणि नाव हे ठाकरे यांना पोटनिवडणुकीसाठी तात्पुरते देण्यात आले होते.

हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी तात्पुरते दिले होते मशाल हे चिन्ह

शिवसेना कुणाची? आणि धनुष्यबाण कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणुक आयोगात असताना अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाली होती त्यामुळे या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते बहाल केले होते. उद्धव ठाकरे गटाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव आणि 'मशाल' हे चिन्ह बहाल करण्यात आलं होतं. तर एकनाथ शिंदे यांना "बाळासाहेबांची शिवसेना" हे नाव आणि "ढाल तलवार" हे चिन्ह बहाल केलं होतं.

निवडणूक आयोगाच्या हातात निर्णय

उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल हे चिन्ह आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव काढून घ्यायचं की नाही हा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातात आहे. त्यामुळे ठाकरे गट आता दोन्हीकडून कोंडी झाली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी बहाल केलेले नाव आणि पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोग कायम ठेवेल का याकडे लक्ष असेल.

आज धनुष्यबाण काढून घेतला उद्या मशाल हे चिन्हही काढून घेतील - ठाकरे

सध्या देशात हुकूमशाही चालू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात भाजपचे लोकं बसलेले आहेत त्यांनी आज धनुष्यबाण काढून घेतला उद्या मशाल हे चिन्हही काढून घेतील. शिवसेना भवनावर दावा करायला मोगलाई लागलीये का? असं मत उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT