Uddhav Thackeray banner 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'भावी मुख्यमंत्री'चं सोडा! मुंबईत उद्धव ठाकरेंचे 'भावी पंतप्रधान'चे बॅनर

रवींद्र देशमुख

मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकदा विविध नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकळे आहेत. काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली. मात्र ठाकरे गटाच्या समर्थकाने थेट उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख केला.

नुकताच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला. दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावण्यात आले.

उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकाच्या वतीने मातोश्री बाहेर भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे असे बॅनर लागले आहेत. बॅनरवर भारताचा नकाशा दिसून येतो. त्या नकाशामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर 'एक संयमी नेतृत्व, भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे', असा उल्लेख करण्यात आला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण देखील शिंदे गटला मिळाला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करत पुन्हा पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. शिवाय विरोधकांच्या आघाडीतही उद्धव ठाकरे सामील झाले आहेत.

विरोधकांची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अद्याप ठरला नसून उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान उल्लेख केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT