Fatal accident

 

Sakal

महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! रस्ते अपघातात दररोज 44 जणांचा मृत्यू; 15 महिन्यांत 46,000 अपघात, 19,888 ठार; ‘या’ 5 जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू; कोणाचे कुंकू पुसले, कोणाचा आधार गेला

राज्यात महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेगही वाढला आहे. प्रवासासाठी कोठेही गेलेले लोक एका दिवसात परत येण्याची घाई करतात. यातून रस्ते अपघात वाढले असून १५ महिन्यांत तब्बल १९ हजार ८८८ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यात पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर व सांगली ग्रामीणमध्ये सर्वाधिक रस्ते अपघाती मृत्यूची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेगही वाढला आहे. प्रवासासाठी कोठेही गेलेले लोक एका दिवसात परत येण्याची घाई करतात. यातून रस्ते अपघात वाढले असून मागील १५ महिन्यांत तब्बल १९ हजार ८८८ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यात पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर व सांगली ग्रामीणमध्ये सर्वाधिक रस्ते अपघाती मृत्यूची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.

१ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२६ या १५ महिन्यांत राज्यात तब्बल ४६ हजार रस्ते अपघात झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १५ महिन्यांत प्रत्येक दिवशी सरासरी ४४ जणांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे. सर्वाधिक रस्ते अपघाती मृत्यूमध्ये सोलापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. सोलापूर-पुणे महामार्ग, सोलापूर-सांगली, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-हैदराबाद या महामार्गांवर सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यूची नोंद आहे. याशिवाय पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात सर्वाधिक अपघाती मृत्यू झाल्याचेही महामार्ग पोलिसांकडील माहितीवरुन समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मागील सव्वावर्षात एकाच अपघातात दोनपेक्षा जास्त मृत्यू अधिक झाले आहेत. सव्वावर्षातील ४६ हजार अपघातात १८ हजार ४४७ अपघात गंभीर स्वरुपाचे तथा भीषण आहेत. दरम्यान, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समित्या कार्यरत आहेत. दरमहा, तीन महिन्यातून एकदा समितीची बैठक अपेक्षित आहे. त्यावेळी जिल्ह्यातील अपघात व अपघाती मृत्यूचा आढावा घेऊन ठोस उपाययोजना केल्या जातात. मात्र, सध्या या बैठकाच होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

१५ महिन्यातील अपघाताची स्थिती

  • जिल्हा अपघाती मृत्यू

  • पुणे ग्रामीण १,२७३

  • नाशिक ग्रामीण १,११७

  • अहिल्यानगर ग्रामीण १,०६८

  • सोलापूर ग्रामीण ८८७

  • सांगली ग्रामीण ६६७

  • एकूण ५,०१२

प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घेतल्यास अपघात कमी होतील

अपघाती मृतांमध्ये रस्ता ओलांडणारे पादचारी, विनाहेल्मेट दुचाकीस्वार अधिक आहेत. याशिवाय महामार्गांवर थांबलेल्या वाहनांना मागून धडकूनही खूप अपघात झाले आहेत. तसेच वाहनांचा मर्यादेपेक्षा जास्त वेग आणि सतत ड्रायव्हिंग, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने, ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. प्रत्येक नागरिकांनी स्वत:च्या जीवाची काळजी घेऊन वाहने चालविल्यास निश्चितपणे अपघात कमी होतील.

- बाळासाहेब भरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT