sucide

 

sakal solapur

महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! गावच्या जत्रेदिवशी वडिलांनी शेतात पाणी द्यायला सांगितल्याने कासेगावात अल्पवयीन मुलाची आत्महत्या, भाऊ शेतात येण्यापूर्वीच घेतला गळफास

गावातील यात्रेच्या दिवशी मला शेतात पाणी देण्यास का सांगता, असे म्हणत रागाच्या भरात १७ वर्षांच्या मुलाने कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिदास अशोक मोरे, असे त्या मुलाचे नाव आहे. रविवारी (ता. ५) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

तात्या लांडगे

सोलापूर : गावातील यात्रेच्या दिवशी मला शेतात पाणी देण्यास का सांगता, असे म्हणत रागाच्या भरात १७ वर्षांच्या मुलाने कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिदास अशोक मोरे, असे त्या मुलाचे नाव आहे. रविवारी (ता. ५) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

हरिदास इयत्ता अकरावीत शिकत होता. रविवारी गावाची जत्रा होती. मात्र, उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी द्यायचे असल्याने वडिलांनी त्याला शेतात जायला सांगितले होते. ‘पिकांना पाणी देऊन जत्रेला ये,’ असे त्यांनी बजावले होते. पण, गावच्या जत्रेच्या दिवशी शेतात का जाऊ, असे म्हणत तो मित्राची दुचाकी घेऊन शेतात गेला. त्याचा राग पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यामुळे वडिलांनी त्याच्या भावाला थोड्या वेळाने शेतात पाठवले. तोपर्यंत हरिदासने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. हे दृश्य पाहताच त्याच्या भावाने सत्तूरने दोरी कापून त्याला खाली उतरवले आणि लगेचच वडिलांना बोलावून घेतले. त्याला तातडीने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हरिदासच्या पश्चात आई-वडील, दोन भावंडे व आजोबा असा परिवार आहे.

तालुकास्तरावर दोनदा कुस्तीत पटकावले विजेतेपद

मेहनतीने व जिद्दीने लाल माती गाजवणारा, भविष्यातील एक तगडा पैलवान अशी हरिदासची ओळख होती. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या हरिदासने कुस्तीच्या लाल आखाड्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याने सलग दोन वर्षे तालुकास्तरावर कुस्तीत विजेतेपद पटकावले होते. गावातील जय हनुमान तालमीत तो दररोज सराव करत होता. त्याची पिळदार शरीरयष्टी आणि कुस्तीतील चपळाईमुळे भविष्यात तो गावाचा नावलौकिक वाढवेल, अशी सर्वांना आशा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT