Crime News  sakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक पुन्हा त्याच शाळेत रुजू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याप्रकरणी ३० जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्या शिक्षकाला जामीन मिळाल्यानंतर शाळेने त्यास पुन्हा तेथेच रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक पुन्हा त्याच शाळेत रुजू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याप्रकरणी ३० जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्या शिक्षकाला जामीन मिळाल्यानंतर शाळेने त्यास पुन्हा तेथेच रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पीडिता अजूनही त्याच शाळेत शिकत आहे, तरीही संस्थेने असा निर्णय घेतल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

संशयित आरोपी शिक्षकाचे नाव हनुमंत नलावडे (वय ५६) याच्याविरुद्ध ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मिळाला. पण, पीडिता त्याच शाळेत इयत्ता अकरावीत शिकायला असतानाही शाळेने त्या शिक्षकाला पुन्हा तेथेच रूजू करून घेतले आहे. यामुळे तो पीडितेवर दबाव आणू शकतो, अशी भीती पीडितेच्या पालकांना आहे. पीडिता सध्या तेथेच अकरावीत शिकत असल्याने त्याला तेथे घेऊ नये, असा अर्ज पीडितेच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.

शाळेला पत्र पाठवून सूचना केल्या आहेत

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या शिक्षकाविरुद्ध शाळेने कारवाई करावी, असे पत्र मुख्याध्यापकांना त्यावेळीच दिले आहे. आता जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून त्या शिक्षकाला रुजू करून घ्यायचे असल्यास त्याच शाळेत नको, असेही शाळेला कळविले आहे. त्याला पुन्हा रुजू करून घेण्यापूर्वी शाळेने मला कळविणे बंधनकारक आहे, अन्यथा मुख्याध्यापकावर कारवाई होऊ शकते.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

गंभीर गुन्हा, तरी अट्टाहास कशासाठी?

विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला तो शिक्षक सतत पीडितेला ‘आता तू सापडली, क्रिकेटची मुलगी’ असे बोलत होता, अशी कबुली वर्गातील २० विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात दिली आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनीही त्या शिक्षकाला न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून शाळेने दुसऱ्या ठिकाणी रुजू करून घ्यावे, या शाळेत नको, असे कळविले आहे. तरीपण, एवढी नामांकित शाळा गंभीर गुन्ह्यातील त्या शिक्षकाला पुन्हा तेथेच रुजू करून घेण्यासाठी एवढा अट्टाहास का करत आहे, याचे उत्तर पालक शोधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT