barshi crime

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! शेअर मार्केटमध्ये १.८१ कोटींचे नुकसान, कर्जबाजारी मुख्याध्यापकाने पत्नी, दोन मुलांना मारुन स्वत:ही घेतला गळफास; २२ पानांची सुसाईड नोट, वाचा...

शेअर बाजारातील तब्बल १ कोटी ८१ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीमुळे नैराश्यात गेलेल्या हात्तीज (ता. बार्शी) येथील मुख्याध्यापकाने पत्नी व दोन मुलांना खाण्याच्या पदार्थातून विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

तात्या लांडगे

वैराग : शेअर बाजारातील तब्बल १ कोटी ८१ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीमुळे नैराश्यात गेलेल्या हात्तीज (ता. बार्शी) येथील मुख्याध्यापकाने पत्नी व दोन मुलांना खाण्याच्या पदार्थातून विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हात्तीज येथील योगेश बाळासाहेब पाटील (वय ४१) यांनी गुरुवारी (ता. ११) रात्री पत्नी माधुरी पाटील (वय ३७), मुलगा अथर्व (वय ११) आणि शिवांश (वय ९) यांना खाण्याच्या पदार्थातून विष दिल्याचा संशय आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत शिक्षकाचे चुलत बंधू महेश कालिदास पाटील (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

शुक्रवारी सकाळी सात-साडेसात वाजूनही योगेश पाटील यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारी व नातेवाईक मंगेश पाटील यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने परिसरातील नागरिकांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी घरातील भीषण दृश्य समोर आले. घरात योगेश पाटील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी माधुरी आणि दोन्ही मुले मृतावस्थेत पडलेली होती. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून शेअर बाजारातील कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामुळे योगेश पाटील मानसिक तणावाखाली होते. आत्महत्येच्या वेळी त्यांची आई नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी गेली होती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२२ पानांची सुसाईट नोट

योगेश पाटील यांनी मृत्यूपूर्वी सुमारे २२ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये शेअर बाजारातील गुंतवणूक, त्यातून वाढत गेलेले नुकसान आणि त्या आर्थिक चक्रात आपण कसे अडकलो याचा उल्लेख आहे. बाजारातील तोट्यातून सावरता येत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करत त्यांनी माफी मागितली आहे. तसेच, आपल्या पश्चात मालमत्ता आई आणि मामाच्या मुलाच्या नावे करण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. इन्शुरन्स काढण्यासाठी डॉक्टरांकडे तपासणीस गेल्यानंतर किडनीचा गंभीर आजार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितल्याचा उल्लेख या चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT