Solapur News ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! ‘विदेशी’चे दर वाढल्याने सोलापूरमध्ये बनावट देशी दारूची निर्मिती; शेती, पडीक जागेसाठी दरमहा लाखाचे भाडे देऊन सुरु केली फॅक्टरी, वाचा...

दारूच्या विविध कंपन्यांचे लेबल, बूच आणून रिकाम्या बाटल्यात बनावट दारू भरली जाते. या अवैध धंद्यासाठी गावापासून दूर अंतरावरील पडीक जमीन भाड्याने घेऊन १५-२० गुंठ्यासाठी जागा मालकास दरमहा एक ते दीड लाखांचे भाडे दिले जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : गोवा व कर्नाटक राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात ऑगस्ट २०२५ पासून देशी-विदेशी दारूचे दर वाढल्याचा गैरफायदा घेऊन सोलापूर, पुणे, कोल्हापूरसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये हातभट्ट्यांच्या जोडीला आता बनावट देशी दारूच्या फॅक्टरी आढळत आहेत. दारूच्या विविध कंपन्यांचे लेबल, बूच आणून रिकाम्या बाटल्यात बनावट दारू भरली जाते. या अवैध धंद्यासाठी गावापासून दूर अंतरावरील पडीक जमीन भाड्याने घेऊन १५-२० गुंठ्यासाठी जागा मालकास दरमहा एक ते दीड लाखांचे भाडे दिले जात आहे.

टॅक्स वाढीनंतर मद्यविक्रीत घट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसुलाचे उद्दिष्ट्य गाठताना नाकी नऊ येत आहे. दुसरीकडे हातभट्टी, बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती, विक्री जोमात सुरू आहे. मुळेगाव तांडा हातभट्टीसाठी राज्यभरात सुपरिचित आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट, करमाळ्यासह अन्य तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर हातभट्ट्या आढळतात.

पण, आता बनावट दारू निर्मितीचेही अड्डे आढळत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत काही दिवसांपूर्वी मुळेगाव तांडा परिसरात बनावट दारू निर्मितीचा अड्डा उद्धवस्त करून एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर वळसंग पोलिसांनी दक्षिण सोलापुरातील मद्रे गावाच्या हद्दीत मोठी कारवाई करून एक कोटींचा बनावट देशी दारूचा साठा जप्त केला आहे. बनावट दारू, हातभट्टी हद्दपार करण्याचे मोठे आव्हान आता पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर असणार आहे.

२० गुंठ्यासाठी दरमहा लाखाचे भाडे

२५ जानेवारी रोजी बनावट देशी दारू वाहतूक करणारा ट्रक वळसंग पोलिसांनी पकडला. चालकाची कसून चौकशी केल्यावर मद्रे गावातील राजकुमार चंद्रकांत टिळेकर याच्या शेतात धुळे, नागपूर येथील तिघांनी देशी दारू निर्मितीची फॅक्टरीच सुरू केल्याचे उघड झाले. पोलिसांनी शेताचा मालक राजकुमार टिळेकरला अटक केली. संशयित आरोपी २० गुंठ्याला दरमहा एक लाख रुपये भाडे देत होते, अशी बाब तपासात समोर आली आहे. यात आणखी एका संशयितास अटक केली असून उर्वरित दोघांच्या शोधासाठी चार पथके रवाना केली आहेत.

बनावट दारु निर्मितीवरही कारवाई

सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून दररोज ठिकठिकाणी धाडी टाकून हातभट्ट्या, अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतुकीवर कारवाया सुरू आहेत. अलीकडे अनेक कारवायांत बनावट देशी दारु आढळत आहे. विविध कंपन्याचे बूच, लेबल, रिकाम्या बाटल्या आणून त्यात घरगुती पद्धतीने बनावट दारु तयार करून ती खरी असल्याचे भासवून विकली जात असल्याचे आढळत आहे.

- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

SCROLL FOR NEXT