ST Bus esakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! बोगस वैद्यकीय दाखला देऊन एसटी महामंडळात मिळविली वाहक-चालकाची नोकरी; विभाग नियंत्रकांच्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध गुन्हा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक भरतीत बनावट वैद्यकीय दाखले देवून नोकरीला लागलेल्या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक भरतीत बनावट वैद्यकीय दाखले देवून नोकरीला लागलेल्या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

राज्याच्या एसटी महामंडळाने चालक व वाहक पदांसाठी दोन वर्षांपूर्वी भरती काढली होती. त्यावेळी अशोक मधुकर साळुंखे, चंद्रकांत शिवाजी रणदिवे या दोघांनी चालक पदांसाठी अर्ज केले होते. त्यासाठी त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून बनावट सही-शिक्का असलेले बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. ते प्रमाणपत्र खरे असल्याचे भासवून राज्य परिवहन महामंडळाला सादर केले. याशिवाय संगीता सूर्यभान घाडगे यांनीही तसेच प्रमाणपत्र देवून महामंडळाची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

विभाग नियंत्रक श्री. गोंजारी यांच्या फिर्यादीवरून अकलूज आगारातील अमोल साळुंखे, चंद्रकांत रणदिवे यांच्यासह वाहक संगीता घाडगे या तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्या तिघांनी २२ मार्च २०२२ ते ६ एप्रिल २०२४ या काळात त्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून महामंडळाची व शासनाची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजित पाटील तपास करीत आहेत.

अनेक प्रवाशांकडेही बनावट दाखले

एसटी महामंडळाच्या बसमधून दिव्यांग प्रवाशांना तिकीट दरात सवलत आहे. याचा गैरफायदा घेवून अनेकांनी कर्णबधिर, पायात अपंग अशी कारणे दाखवून सवलतीचे पास घेतल्याचेही सांगितले जात आहे. त्याचीही भविष्यात पडताळणी होवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT