solapur crime news

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील धक्कादायक घटना! व्हिडिओ बनवून तृतीयपंथी ‘स्विटी’ची प्रेमातून आत्महत्या; शुक्रवारी विवाह असलेला तरुण जेरबंद, काय आहे नेमका प्रकार, वाचा...

तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांतून पाच वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या प्रकाश व्यंकप्पा कोळी (स्विटी, वय २२) या तृतीयपंथीने गुरुवारी (ता. ४) बाळे परिसरातील भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे कारण म्हणजे, तो तरुण स्विटीला सोडून दुसऱ्या तरुणीशी विवाह करणार होता.

तात्या लांडगे

सोलापूर : तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांतून पाच वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या प्रकाश व्यंकप्पा कोळी (स्विटी, वय २२) या तृतीयपंथीने गुरुवारी (ता. ४) बाळे परिसरातील भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे कारण म्हणजे, तो तरुण स्विटीला सोडून दुसऱ्या तरुणीशी विवाह करणार होता. या प्रकरणात उद्या (शुक्रवारी) विवाह असलेल्या सुजित अप्पासाहेब जमादार (रा. वैद्यवाडी, प्रियांका चौक, सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपी सुजितचे वय सध्या २३ असून त्याचे पाच वर्षांपासून प्रकाशसोबत (स्विटी) प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही बाळे परिसरातील साईननगरात भाड्याने खोली केली होती. त्याच ठिकाणी ते काही महिने राहिले. अलीकडे सुजित त्याच्या घरी राहायला होता. स्विटी राहत असलेल्या घराचे भाडे सुजितच देत होता. पण, इतके वर्षे माझ्यासोबत प्रेमाचे नाटक करून राहिलेला सुजित दुसऱ्याच तरुणीशी विवाह करत असल्याने तृतीयपंथी प्रकाश मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यातून त्याने व्हिडिओ तयार करून गुरुवारी (ता. ४) भाड्याच्या खोलीत गळफास घेतला

त्याला बेशुद्ध अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस घटनास्थळी पोचले. याप्रकरणी नागेश व्यंकप्पा कोळी (रा. विद्या नगर, शेळगी) याने फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी सुजित जमादार यास अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे तपास करीत आहेत.

व्हिडिओतून प्रकाश काय म्हणाला?

‘मी जे पाऊल उचलत आहे, त्याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार हा आहे. माझ्याशी लग्न केले, खोटे प्रेम केले, आठ वर्षे राहिला आणि धोका दिला,’ असा व्हिडिओ प्रकाश व्यंकप्पा कोळी (स्विटी) या तृतीयपंथीने रडत रडत व्हिडिओ बनविला होता. आत्महत्येपूर्वी प्रकाशने तो व्हिडिओ त्याच्या बहिणीसह जवळच्यांना पाठविला होता.

हळदीच्या मंडपातून सुजितला अटक

प्रकाश कोळी या तृतीयपंथीच्या आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी सुजित जमादारला पोलिसांनी अटक केली आहे. डी-फार्मसीला शिकणाऱ्या तरुणीसोबत सुजितचा शुक्रवारी विवाह होणार होता. तो स्वत: मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) काम करीत होता. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्याला हळदीच्या मंडपातून अटक केली आहे. त्याला उद्या (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ची भाजपला धक्का देण्याची तयारी; राजकारणात सगळं शक्य, इम्तियाज जलील यांचा इशारा!

मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ठप्पच, पर्यायी मार्ग वापरा; प्रवासाला ४-५ तास जास्त लागू शकतात, ट्राफिक पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प, १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

तीन सख्ख्या बहिणींनी ९व्या मजल्यावरून मारली उडी; तिघींची एकच सवय ठरली घातक? काय घडलं?

Akola News : अकोल्यात‘एमबीबीएस’च्या ५० जागांची होणार वाढ; राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण मत्रांलयाकडे प्रस्ताव सादर

SCROLL FOR NEXT