पुरात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी हलवताना कर्मचारी. sakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक वास्तव! पुरात मदतीसाठी बोट चालवणारे सोलापूर जिल्ह्यात अवघे तिघेच; भीमाकाठाला नेहमीच पुराचा धोका; किती विसर्ग नदीत सोडल्यावर कोठे येतो पूर? वाचा...

संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन सोलापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती कक्ष अद्ययावत असायला हवेत. मात्र, पूरस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी पुरात बोट चालविण्याचे कौशल्य जिल्ह्यात अवघ्या तिघांकडेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात २०१९, २०२० व २०२२ या वर्षी भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीत विसर्ग वाढला आणि सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतो, त्यावेळी हमखास भीमा नदीकाठी पुराचा धोका निर्माण होतो. संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन सोलापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती कक्ष अद्ययावत असायला हवेत. मात्र, पूरस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी पुरात बोट चालविण्याचे कौशल्य जिल्ह्यात अवघ्या तिघांकडेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

उजनी ते पंढरपूर ११० कि.मी. भीमा नदीचे पात्र असून, पुढे अक्कलकोटपर्यंत भीमा नदीचे पात्र आहे. सध्या वीर धरणातून भीमा नदीपात्रात ३३ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, उजनी धरणातूनही एक लाख दहा हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी (ता. ५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते पाणी पंढरपूरपर्यंत पोचेल. त्यावेळी पंढरपूरसह नदी काठावरील काही गावांना पूरस्थिती जाणवेल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

जिल्ह्यात अग्निशामकचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील, कोतवाल, एनसीसीचे विद्यार्थी, सैन्यातील निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण दिल्यास जिल्ह्यात उद्‌भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा यशस्वीपणे सामना करून पुरात अडकलेल्यांना वेळेत मदत शक्य होणार आहे. मात्र, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे पण ते अद्याप कागदावरच आहे. सध्या पंढरपूर नगरपरिषदेतील दोन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनाच पुरात व्यवस्थितपणे बोट चालविता येते. याशिवाय जिल्ह्यात एकही प्रशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना बोट चालविता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुरामुळे धोका होवू शकणार गावे

  • माढा : रांझणी, अळेगाव (बुद्रुक), रूई, घरअकोले, टाकळी, चांदज, वडोळी, शेवरे.

  • माळशिरस : संगम, बाभूळगाव, वाघोली, लवंग, वाफेगाव, महाळूंग, मिरे, कोंढारपट्टा, नेवरे, जांभूळ, खळवे, दसूर, उंबरे.

  • पंढरपूर : पंढरपूर, पिराची कुरोली, वाडी कुरोली, भंडीशेगाव, खेड भाळवणी, शेवळे, कवठाळे, शिरढोण, वाघरे, इसबावी, गोपाळपूर, मुंढेवाडी, चळे, अंबे, सरकोली.

  • मंगळवेढा : उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, सिधापूर, तांडूर, अरळे.

नदीतील विसर्ग अन्‌ पुराची संभाव्य स्थिती

  • भीमा नदी पात्रात एक लाख ३० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरते.

  • एक लाख ५५ ते ६० हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते.

  • नदी पात्रात दोन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते.

  • भीमा नदी पात्रात दोन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोविंदपुरा येथे पाणी येते.

  • तीन लाख क्युसेक विसर्ग नदी पात्रात आल्यावर कबीर मठ पायथा, जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे एक ते दीड फुट पाणी येते.

  • तीन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग नदीत सोडल्यावर दत्तघाट, माहेश्वरी धर्मशाळा, महाव्दार घाट, कालिका मंदिर चौक या भागात सुमारे एक फुट पाणी येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT