Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक प्रकार! १८ दिवसाच्या बाळाला तीन महिलांनी ३ लाखाला विकले; मेंदुचा आजार असल्याचे खोटे सांगितले

चौथा मुलगा झालेल्या मातेकडून एका नर्सिंग होममधील महिलेने संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर बाळाला मेंदूचा आजार असून त्यासाठी मोठा खर्च असल्याचे सांगून बाळ सांभाळायला देण्याचा बहाणा केला. मध्यस्थी महिलांनी एका महिलेला तीन लाख रुपयांत बाळ विकले.

तात्या लांडगे

सोलापूर : तीन मुलानंतर चौथा मुलगा झालेल्या मातेकडून एका नर्सिंग होममधील महिलेने संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर बाळाला मेंदूचा आजार असून त्यासाठी मोठा खर्च असल्याचे सांगून बाळ सांभाळायला देण्याचा बहाणा केला. त्यानंतर मध्यस्थी तीन महिलांनी सोलापुरातील एका महिलेला तीन लाख रुपयांत बाळ विकले. विशेष म्हणजे सर्व पैसे तिघींनी आपापसांत वाटून घेतले आणि त्या चिमुकल्याच्या आईला एक रुपयादेखील दिले नाहीत.

आजारी बाळावर ओळखीच्या डॉक्टरकडून उपचार करूयात म्हणून मध्यस्थी महिलेने त्या बाळाला ताब्यात घेतले आणि विकून टाकले. बाळ कोणाला देताय, कोणत्या दवाखान्यात उपचारासाठी ठेवले आहे, असे प्रश्न विचारल्यानंतर त्या मध्यस्थी महिलेने पैसे देण्याचे आमिष दाखवले. पण, अगोदरच त्या तीन महिलांनी ज्याला बाळ विकले, त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते. चिमुकल्याच्या आकांताने रडत आलेल्या त्या मातेच्या वेदना समजून सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार रफिक इनामदार यांनी मध्यस्थी महिलेचे घर गाठले.

त्यानंतर एक-एक करीत या प्रकरणात एकूण चार महिलांनी मध्यस्थी केल्याची बाब समोर आली. एकीने ८० हजार रुपये, दुसरीने २० हजार आणि तिसरीने (मुख्य सूत्रधार) दोन लाख रुपये घेतले होते. बॉण्ड करूनही पैसेही नाहीत आणि बाळही नाही म्हणून त्या चिमुकल्याच्या आईने पोलिस ठाणे गाठले होते. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित महिला आरोपीने यापूर्वी देखील असेच प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यादृष्टिने आता तपास सुरु आहे.

५० हजारांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून उर्वरित रक्कम अजून मिळालेली नाही. या प्रकरणात पोलिसांनी बाळाची आई-वडिल, मध्यस्थी महिलांसह बाळ विकत घेणारे, अशा एकूण १० जणांविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.

बाळाला नाही कोणताही आजार, तरी...

मेंदूचा आजार असून वेळेत उपचार केले नाहीतर बाळच्या जिवाला धोका होईल, अशी भीती दाखवून मध्यस्थी महिलेने त्या बाळाला विकण्याचा प्लॅन आखला. दोन मुली असलेल्या एका महिलेच्या आईशी संपर्क करून त्यांना त्या चिमुकल्याची विक्री केली. मुलीला दोन मुलीच असून आता मुलगा मिळेल म्हणून तिच्या आईने दागिने मोडून तीन लाखांची जुळवाजुळव करून मध्यस्थी महिलांना दिले होते.

पण, यातील त्या चिमुकल्याला कोणताही आजार नव्हता, ही बाब पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, ज्या महिलेने बाळ घेतले, तिने सुरवातीला पोलिसांनी हैदराबादला दिल्याचे सांगितले होते. पण, सायबरच्या माध्यमातून लोकेशन सोलापूरचे निघाले आणि पोलिसांनी बाळ ताब्यात घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मातेच्या ताब्यात दिले. पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT