महाराष्ट्र बातम्या

सोमय्यांना फाईल दाखवणे पडले महागात; तीन जणांना कारणे दाखवा नोटीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसा त्यांचा नेहमीच दावा असतो. मात्र, आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. किरीट सोमय्या (Kirtit Somaiya) यांनी काल सोमवारी मंत्रालयात जाऊन फाईल्स बघितल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. (Uddhav Thackeray)

सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल घेतली असून मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता तीन जणांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन नियोजनकार आणि एक कक्ष अधिकारी अशा तीन जणांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. काल किरीट सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये आज गेले होते. तिथे ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स बघितल्या. कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स चेक करतानाचे किरीट सोमय्या यांचे हे मंत्रालयातील फोटो व्हायरल झाले आहेत.

किरीट सोमय्या यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी कार्यालयात घुसखोरी या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सचिन सावंत यांनी म्हटले होते. मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही. मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली, असे स्पष्टीकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याची छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले. तसेच मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT