Raj Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackrey: फडणवीसांचा तो व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंचा संतप्त सवाल म्हणाले, हे खरंय का? मग...

Raj Thackeray showing video of Fadnavis: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून टोलदरवाढीवरून मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई - राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून टोलदरवाढीवरून मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मुलुंड-ठाणे टोलदरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र या भाजपा-शिवसेनेच्या जाहिरनाम्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दावा केला आहे.

फडणवीसांनी केलेल्या या दाव्याचा व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे. व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 'आम्ही जी घोषणा केली होती, त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून पैसे दिलेले आहेत', असा दावा फडणवीसांनी केला आहे.

त्यावर राज ठाकरे म्हणाले हे खरं आहे का? म्हणजे याला धादांत खोटं म्हणायचं का? मग टोलनाक्यावरील, रोड टॅक्सचे पैसे जातायत कुठे? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात, पैसे मिळत असल्याने टोल बंद होणं अशक्य, असं राज ठाकरे म्हणाले.

टोलचे पैसे जातात कुठे? लाव रे तो व्हिडिओ...

आपलं टोलचं आंदोलन २००९-१० च्या सुमारास सुरू झालं, हा टोलचा सगळा कॅशमधला पैसा जातो कुठे? याचं होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्याना हे टोल मिळतात कसे? यानंतरही शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे असा प्रश्न पडतो असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT