Devendra Fadnavis and Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : ''त्यांच्याकडे धनुष्यबाण असला तरी माझ्याकडे रॉकेट आहे'', भाजप आमदाराचा श्रीकांत शिंदेंना इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः कल्याण लोकसभा निवडणुकीवरुन भाजप-शिवसेनेमध्ये मागे वाद उफाळून आलेला होता. आता पुन्हा एका वादाची ठिणगी पडली आहे. मंत्र्यासमोरच भाजप आमदाराने श्रीकांत शिंदे यांना इशारा दिला आहे. 'एकदा लोकसभा निवडणूक होऊ द्या' असं म्हणत त्यांनी थेट भाष्य केलं.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्येच मुख्यमंत्री यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही, अशा शब्दात त्यांनी टीकास्र सोडलं.

कल्याणध्ये भाजप कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. रविवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, त्यांच्याकडे भलेही धनुष्यबाण असेल परंतु माझ्याकडे रॉकेट आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसं उत्तर देईल. एकदा लोकसभा निवडणुका होऊ द्या मग प्रत्येक आरोपांचं उत्तर देतो, असा इशाराच त्यांनी श्रीकांत शिंदेंना दिला.

आमदार गणपत गायकवाड पुढे म्हणाले की, मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. निधीच्या फाईल्स कुठे अडवून ठेवल्या आहे हे जनतेला सांगणार आहे. सध्या सणांचा काळ आहे. पोलिसांना मोठा ताण येतोय. तरीही शिवसेनेच्या गुंडांना सुरक्षा पुरवली जात आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

''अनेक विकासकामांसाठी मी मंजुऱ्या घेऊन निधी आणला. परंतु आज श्रेय घेण्यासाठी काही लोक पुढे येत आहेत. मात्र आता काही बोलता येत नाही. निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांच्यासोबत फिरायचं आहे. सध्या माझ्यावर काय आरोप करायचे ते करा. परंतु तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाहीत, तेवढे पुरावे मी सादर करीन'' अशा शब्दात गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेवर नाव न घेता टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT