Uddhav Thackeray, Shrikant Shinde and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

दसरा मेळाव्यात शिंदे पुत्राला मिळणार मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राजकीय उलथापालथ घडवत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवलं. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. तेव्हापासून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात कमालीचा संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष कोर्टात असताना दसरा मेळाव्यावरून देखील दोन्ही पक्ष आमने-सामने आले होते. त्यामुळे दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातच या दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Shrikant Shinde news in Marathi)

४० आमदार घेऊन बाजूला निघालेले एकनाथ शिंदे आपल्या गटालाच खरी शिवसेना मानतात. त्यातच अनेक खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुळ शिवसेना कमकुवत झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पूर्वीपेक्षा अधिक सक्रीय झाले आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाकडून देखील युवासेना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू आहे. याचे संकेत एका खासदाराने केलेल्या मागणीमुळे मिळाले होते. त्यामुळे श्रीकांत शिंदें यांच्याकडे युवासेना प्रमुखपदाची मोठी जबाबदारी जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिंदे गटातील खासदार प्रताप जाधव यांनी काही दिवसांपूर्वी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे युवासेना प्रमुखपदाची जबाबदारी देण्याची मागणी केली होती.

दरम्यान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यातच आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. यंदा शिवसेनेचे दोन्ही गट दसरा मेळावा घेणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातच श्रीकांत शिंदे यांच्याकडे युवासेना प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात येते का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेसाठी रवाना; थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक, तोडगा निघणार?

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT