Shriniwas Vanga Sakal
महाराष्ट्र बातम्या

"श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदाराची स्वतःविरोधातच पोस्ट

त्यांच्याच अकाऊंटवरून करण्यात आलेली त्याच्याविरोधातील पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

"शिवसेना आणि कट्टर शिवसेनेच्या जीवावर निवडून यायचं आणि परत शिवसेनेशी बंड करायचं असा जनतेसोबत गद्दारी करणारा आमदार श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार...." अशी फेसबुक पोस्ट आमदार श्रीनिवास चिंतामन वनगा यांच्या अधिकृत फेसबुकवरून करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्याच अकाऊंटवरून करण्यात आलेली त्याच्याविरोधातील पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

(Shriniwas Vanga Facebook Post)

दरम्यान ही पोस्ट श्रीनिवास वानगा यांच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याची माहिती आहे. वानगा यांचे फेसबुक अकाऊंट हँडल करणाऱ्या कार्यकर्त्याने ही पोस्ट केली आहे. त्यांचा फोटो लावून त्याच्यावर गद्दार असं लिहिलं आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=565366425098150&id=100048743932320&sfnsn=wiwspwa

श्रीनिवास वानगा हे शिवसेनेचे पालघरचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ३९ आमदारांनी घेऊन पक्षाला बंड केले त्यामध्ये यांचाही सामावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर मुंबईत आणि महाराष्ट्रातही त्यांच्याविरोधात आंदोलन आणि तोडफोड करण्यात आली आहे. तर काही आमदारांना धमक्याही देण्यात आल्या आहेत. आमदारांच्या विरोधात टिकेचा सूर जनतेत उमटू लागला असून वानगा यांच्याच फेसबुकवर त्यांना गद्दार असा शिक्का लावण्यात आला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाला बंड केलं आहे. शिंदे गटाला वेगळा गट स्थापन करणे किंवा एखाद्या पक्षात विलिन होणे हे दोन पर्याय आहेत. हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या वेगळी दिशा मिळाली आहे. महाविकास आघाडी टिकवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT