Shubhangi Patil and Balasaheb Thorat 
महाराष्ट्र बातम्या

Shubhangi Patil : भेटीसाठी थोरातांच्या घरी गेलेल्या शुभांगी पाटलांना प्रवेश नाकारला; कारण...

सकाळ डिजिटल टीम

नगर - नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. तर काँग्रेसकडून मात्र तांबे पिता-पुत्रावर कारवाई करण्यात आली असून शुभांगी पाटील यांना पाठिबाही जाहीर केला. मात्र थोरात कुटुंब यापासून दूर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Shubhangi Patil news in Marathi)

बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच आज महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणुकीला सामोरं जात असलेल्या शुभांगी पाटील यांनी आज बाळासाहेब थोरात यांचं घर गाठलं होतं. मात्र त्यांना घरात प्रवेश देण्यात आला नाही. विशेष म्हणजे आपण थोरात साहेबांना फोन करून आलो, असंही त्या वॉचमनला सांगत होत्या. मात्र तरी देखील त्यांना प्रवेश देण्यात आला नाही.

त्यानंतर शुंभागी पाटील यांनी गेटवरूनच थोरात यांना फोन केला. फोनवर त्या म्हणाल्या की, मी तुमच्या घरी आले आहे. पण वॉचमन प्रवेश देत नाही. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी फोन वॉचमनकडे दिला. त्यानंतरही वॉचमन म्हणाला, प्रवेश देता येणार नाही. बंगल्यात कोणीच नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आलं आहे.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्यावर मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या घरी कोणीही नाही. मात्र त्याचवेळी त्यांच्यावर उपचार सुरू आहे, हे शुभांगी पाटील यांना माहित नव्हतं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय पाटील यांनी फोन कोणाला केला, असाही प्रश्न उपस्तिथ होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT