Shubhangi Patil
Shubhangi Patil 
महाराष्ट्र

Shubhangi Patil : "राजा का बेटा राजा नही बनेगा..."; शिवसेनेच्या उमेदवारीने चुरस वाढली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंधळ उडाला असताना आता सत्यजीत तांबे यांना धक्का देणारा निर्णय झाला आहे. महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आली असून शुभांगी पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी काळातील थेट तीन उमेदवारांमध्ये असणार आहे.

काँग्रेसकडून या जागेसाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेऊन काँग्रेसला धक्का दिला. तसेच त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र काँग्रेसने सत्यजीत यांना पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे सत्यजीत तांबे यांचा मार्ग खडतर होणार आहे.

शुंभागी पाटील काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये होत्या. शिवाय त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना मिळणार हे दिसताच, शुंभागी पाटील यांनी मातोश्रीसोबत संपर्क साधला. तसेच ठाकरे गटाने त्यांना उमेदवारीही दिली.

'राजा का बेटा राजा नही बनेगा जो काबिल है वही राजा बनेगा', असं म्हणत शुभांगी पाटील यांनी रणशिंग फुंकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT