Sifar-Jirgale 
महाराष्ट्र बातम्या

दहा वर्षांच्या सिफरने सुरू केले ग्रंथालय

प्रणिता मारणे

पुणे - सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांना मोबाईल आणि पुस्तके हा पर्याय दिला, तर ८० टक्के मुले मोबाईलच निवडतील. त्यामुळे मराठी साहित्यातील कविता, कादंबऱ्या, महत्त्वाची पुस्तके लहान मुलांपर्यंत पोचणे दुरापास्त होत चालले आहे. परंतु याला अपवाद ठरत सिफर जिरगाळे या दहा वर्षांच्या मुलाने ४०० पुस्तके वाचली आणि स्वतःचे ग्रंथालयही सुरू केले आहे.

सिफर आणि त्याच्या मित्रांनी सुरू केलेल्या ग्रंथालयात केवळ सुटीपुरते नव्हे, तर वर्षभर पुस्तकांची देवाण-घेवाण होते. वारजे येथील आदित्य गार्डन सिटी येथे ‘एकलेक्‍टिक बुक क्‍लब’ हे ग्रंथालय गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीपासून सुरू आहे. सिफरचे वडील विश्‍वेश जिरगाळे आणि आई स्मिता जिरगाळे यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ते संस्कार सिफरवरही झाले. त्यातूनच त्याने ४०० पुस्तके वाचून काढली. त्यानंतर ही पुस्तके मित्र-मैत्रिणींना द्यायची का? या विचारातूनच ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना उदयाला आली. त्याच्या ग्रंथालयाचे ४४ सदस्य असून, ४२५ पुस्तके आहेत. साधारण ३३५ पुस्तके वाचली गेली आहेत. दर सोमवारी आणि मंगळवारी हे ग्रंथालय सुरू असते. प्रत्येक पुस्तकाची नोंद वहीमध्ये ठेवली जाते. ग्रंथालयासाठी ५० रुपये मासिक शुल्क असून, त्यातून आणखी पुस्तके विकत घेतली गेली. या ग्रंथालयाची व्याप्ती किती आहे, यापेक्षा केवळ ६ ते १२ वयोगटांतील मुले पुस्तकांसोबत दिसतात, असे आशादायी चित्र पाहायला मिळत आहे.

आई-वडिलांना वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळेच हळूहळू मीसुद्धा पुस्तके वाचायला लागलो. यातूनच अनेक पुस्तकांचा संग्रह तयार झाला. सध्या ग्रंथालयाचे जमेल तसे काम सुरू आहे. परंतु, पुस्तकांसाठी अनेक उपक्रम सुरू करणार आहेत. 
- सिफर जिरगाळे

 ग्रंथालयासाठी मुलांमध्ये आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही. त्यासाठी पूरक वातावरण तयार केले, ज्यामुळे वाचनाचे संस्कार झाले. वाचनाच्या प्रत्येक उपक्रमात आमचा त्याला नेहमीच पाठिंबा असतो.
- विश्‍वेश जिरगाळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

Solapur Water Crisis: उजनी धरणात उणे २४.३७% पाणीसाठा, साेलापूर जिल्ह्यातील ४४ तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT