Rain update sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Update : जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत;सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

जून महिन्यात पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत असून, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जून महिन्यात पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत असून, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत असले तरी कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज सोमवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. डॉ. महापात्रा म्हणाले, की जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात देशात सरासरी १६५.३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जून अखेर सरासरी १४७.२ मिलिमीटर म्हणजेच ८९ टक्के पाऊस झाला आहे.

जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारत, वायव्य आणि पूर्व भारताचा काही भाग आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ला-निना विकसित होत असल्याचेही संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढच्या तीन तासात अति मुसळधार पावसाची शक्यता

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT